तुळजापुर : कुमार नाईकवाडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते तथा माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर (आबा) पाटील यांच्या ६३ व्या जयंतीचे औचित्य साधुन दि. १६ ऑगष्ट रविवार रोजी तुळजापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील जगदाळे कॉम्पलेक्स येथे प्रथम कै. आर आर पाटील यांच्या प्रतिमेची पुजा करुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या वेळी रा.काँ. प्रदेश सरचिटणीस गोकुळ शिंदे, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, धनंजय पाटील, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, युवकचे शहर अध्यक्ष शरद जगदाळे, रोहित चव्हाण, शहर अध्यक्ष अमर चोपदार, शशीकांत नवले, संदीप गंगणे, आप्पासाहेब पवार, फिरोज पठाण, तौफीक शेख, खंडु जाधव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.