नळदुर्ग, दि. 16 : तुळजापूर तालुक्यातील शहापूर व दहिटणा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्हयाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गावास भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला. तसेच गावातील लोकप्रतिनिधी, नागरिकांशी चर्चा केली. यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबास आर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यास सुपूर्द करण्यात आल्या.
त्याचबरोबर कंटेनमेंट भागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना खा. निंबाळकर यांनी प्रशासकीय यंत्रणेस देण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, बाळकृष्ण पाटील, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरवडे, शहापूरच्या सरपंच उर्मिला धोंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग मोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन काळे, माजी उपसरपंच नाना पाटील, शहापूरचे ग्रामसेवक निलागर, तलाठी जमादार, विकास सुरवसे, सचिन मोरे, बाबा जाधव, विजय काळे तर दहिटणा येथील तंटामुक्ती अध्यक्ष बलभीम गुड्डे, ग्रामसेवक सचिन राठोड, उमाकांत कदम यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी आदी संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.