उस्मानाबाद, दि. ९ : जिल्ह्यात आज रविवार (दि. ९) तर रोजी 206 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 37, तुळजापूर तालुका 47, उमरगा तालुका 19, कळंब तालुका 49, परंडा तालुका 24, लोहारा तालुका 11, भुम तालुका 18 व वाशी तालुक्यातील एकाचा समावेश आहे. आता जिल्ह्यात एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 2 हजार 468 इतकी झाली आहे. यातील 814 जण बरे झाले आहेत. एकूण 64 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 590 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांच्यावतीने शासकीय वैदयकीय महाविद्यालय (घाटी) औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकण 420 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाला असून तो खालीलप्रमाणे आहे




