यवतमाळ : येथील समाज सेविका तसेच शिवसेना महिला उपशहर प्रमुख असलेल्या पुष्पा संतोष जाधव ह्या गेल्या अनेक वर्षापासून विवीध उपक्रम राबवित असुन त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय बंजारा मिशन चे संस्थापक अध्यक्ष  देवराव राठोड यांनी पुष्पा संतोष जाधव यांची महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी निवड केली आहे. 

पुष्पा जाधव यांनी कोरोनाच्या काळात अत्यंत गरजुनां जिवनावश्यक वस्तु तसेच जेवणाच्या डब्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात त्यांची मोलाची भुमिका आहे. बंजारा समाजा वर होणाऱ्या अन्याय आत्याचार च्या विरुद्ध सदैव तत्पर असतात. 

बंजारा समाजाच्या ST आरक्षण साठी संविधानिक लढा देण्याकरीता  व समाजसेवा करण्यासाठी या पदा चा वापर करण्याची ईच्छा व्यक्त केली. 

त्यांना मिळालेल्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदाचा समाजसेवेसाठी चांगला वापर करुन दिलेल्या संधीचे सोने   करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष देवरावजी राठोड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सविता चव्हाण, वसंत जाधव राष्ट्रीय मिडीया प्रभारी यांना दिले.

 
Top