तुळजापुर, दि. ०९ :
राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष पदी अमर (नाना) चोपदार व शिवसेना तुळजापुर उप तालुका प्रमुख पदी रोहित नागनाथराव चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल शिवबाराजे प्रतिष्ठान व बजरंग दल यांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.
यावेळी छावा संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष जिवनराजे इंगळे, कृष्णा रोचकरी, सुजीत साठे, अलोक शिंदे, अक्षय दिवटे, प्रवीण छत्रे, अक्षय कारभारी, चेतन बंडगर, तानाजी साळुंके, अर्जुन आप्पा साळुंके आदी उपस्थित होते.


