नळदुर्ग, दि. 07 : चिकुंद्रा, ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्यावतीने पदोन्नती मिळालेले नूतन विस्ताराधिकारी राजेंद्र कानडे यांच्या निवासस्थानी शाळेतील शिक्षक कर्मचा-यांनी भेट देवून त्यांचा भव्य सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. 

यावेळी मुख्याध्यापक हरिदास माहाबोले, सहशिक्षक किशोर पिसे, गरड ज्ञानेश्वर, विशाल जाधव आदीजण उपस्थित होते. तर शाळेतील सहशिक्षक सचिन ढेपे, सुनील सुर्यवंशी, संजय श्रीनामे आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

 
Top