उमरगा, दि. 07 : ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना हटवून त्या जागी एकनाथ शिंदे यांना अध्यक्ष करावे, कोपर्डी प्रकरणांतील आरोपींना शिक्षा मिळावी, मराठा क्रांती मोर्च्याच्या वेळी आत्मबलिदान दिलेल्या तरुणांना त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेसाठी भरीव निधीची तरतूद करावी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कार्यान्वित करुन निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अरबी समुद्रातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या बांधकामा वरील बंदी उठवुन कामास गती द्यावी, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उमरगा तहसीलदारां मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे आय टी सेल जिल्हाध्यक्ष शैलेश लोखंडे, उमरगा तालुकाध्यक्ष विष्णु भोसले, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष अमोल पाटील, शहराध्यक्ष सुमित नाना घोटाळे, तालुका कार्याध्यक्ष बाळु शिंदे, उपस्थित होते.

