तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
शिवरत्न सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार सर्जेराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दि.७ रोजी तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील भाजीविक्रेत्यांना शिवरत्न मित्र परीवाराच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असुन या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह अनेक सामाजिक संघटनांना प्रयत्न करत आहेत.या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,पत्रकार तथा संभाजी ब्रिगेड व ब्रिक्स मानवाधिकार मिशनचे तालुकाध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शिवरत्न मित्र परीवाराच्या वतीने तामलवाडी येथील भाजीविक्रेते व फळविक्रेत्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येकांनी मास्क, सॅनिटाइजरचा वापर करून सामाजिक अंतर ठेवुनच भाज्यांची खरेदी-विक्री करावी व आपली काळजी घ्यावी अशा सुचनाही यावेळी भाजीविक्रेत्यांना देण्यात आल्या.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचे वाटप केल्याने शिवरत्न मित्र परीवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी माजी सरपंच बापुसाहेब पाटील, तरूण भारतचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश गायकवाड, भ्रष्टाचार निर्मुलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत, पत्रकार सर्जेराव गायकवाड, शिवरत्न प्रतिष्ठानचे सचिव अप्पुराजे भोसले, संभाजी ब्रिगेडचे निरंजन करंडे, सचिन शिंदे, प्रशांत राऊत, नागेश शिंदे, बाळु डोलारे, बापु रणसुरे, रामदास गायकवाड ,दादा पाटील, अमोल शिंदे, उमेश गायकवाड, नागेश शिंदे, विकास घोटकर, कृष्णा घोटकर, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
