तुळजापुर : कुमार नाईकवाडी

हिंदु धर्मियाचा पवित्र सण असलेला कृष्ण जन्माष्टमी येथील झुंझार हनुमान मंडळाच्या वतीने दर वर्षी मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमी सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. माञ या वर्षी संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगामुळे कृष्ण जन्माष्टमी सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम राबवुन "कृष्ण जन्माष्टमी सण उत्साहात साजरा न करता अंत्यत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

मंगळवारी सायंकाळी  श्रीकृष्णाच्या मुर्तीस पंचामृत अभिषेक घालुन श्री कृष्णास पाळण्यात ठेवुन अंगाई गीत गाऊन सायंकाळी १२ वाजता गुलालाची उधळण करीत पुष्पवृष्टी करीत सामाजिक अंतर पाळुन मोजक्या नागरीकांच्या उपस्थित टाळ मृदगांच्या गजरात श्री कृष्ण जन्माष्टमी सण साजरा करण्यात आला. 


यानंतर शहरातील नागरीकांनी घरोघरी पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी सण भक्ती भावाने साजरा करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कारी येथील देवांश महेश गादेकर बालकाचा गोकुळ अष्टमी दिनी त्याचा जन्म झाल्याने त्याच्या घरातील पाल्यानी आपल्या लाडक्या बालकाचा वाढदिवस गोकुळ अष्टमी दिनी श्री कृष्णा सारखी वेशभुषा परिधान करुन आपल्या बालकाचा वाढदिवस मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. बुधवारी दहीहंडी कार्यक्रमही साध्या पद्धतीने मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.


 
Top