तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवार रोजी संस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या सूचनेनुसार व व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध देशी जातीचे सहाशे वृक्ष महाविद्यालय परिसरात लावण्याचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य शेखर जगदे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी वृक्षलागवड समितीचे पदाधिकारी प्रा. संतोष एकदंते, प्रा.विजय माळगी, विलास भोसले तसेच सर्व विभाग प्रमुख, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. शेखर जगदे म्हणाले की, महाविद्यालय परिसरात सागवान, कडूनिंब, चिंच, बदाम, कैर देशी जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे व झाडे जोपासण्याची जबाबदारी महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्याकडे देण्यात आली आहे.


 
Top