तुळजापुर : कुमार नाईकवाडी
श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनाचे औचित्य साधुन 72 वा हरीनाम सप्ताहच्या निमित्ताने येथील झुंजार भजनी मंडळ व दिपक संघाच्यावतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
यामध्ये सात दिवस रोज मास्क, सिनेटायझर वाटप करण्यात आले. तसेच पंगतीच्या (जेवण)माध्यातुन गल्लीमधील सर्व पंगत धारकांनी दररोज अन्नपाकीट वाटप करण्यात आले. तसेच संपुर्ण दिपक संघ परीसर (गल्ली) जंतु नाशकाची फवारणी करण्यात आली. भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.
सदरील वृक्षारोपण व रक्तदान शिबीराचे उद्दघाटन नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते झाले. या सप्ताहासाठी संयोजक नितीन रोचकरी, संजय पैलवान, उमेश पैलवान, योगेश रोचकरी, भरत सोनवणे, आमोल सोनवणे, खंडु जाधव, लल्ला जळके, नितीन पैलवान, दिनेश बागल, नितीन धोत्रे, नागनाथ गवळी, नागेश दिवटे आदींनी परीश्रम घेतले.