मुरुम, दि. २२ : महाड तालुक्यात कार्यरत असणारे मांडले हायस्कुल, मांडले गणित विषयाचे विद्यार्थी प्रिय माध्यमिक सहशिक्षक दयानंद बाबुराव मोटे (वय ४३ वर्ष) यांचे शनिवारी (दि.२२) रोजी सकाळी ठीक ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते मुळ यशवंत नगर, मुरुम मधील रहिवाशी होते.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी रोजी दुपारी ५.३० वाजता सार्वजनिक स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, मोठे बंधू असा परिवार आहे. आदर्श महाविद्यालय, उमरगा येथील प्रा.डॉ.जयराम मोटे यांचे ते छोटे बंधू होते.