उमरगा, दि. 22 :
संदेश लिंबराज मारेकर, वय 35 वर्षे, रा. माडज, ता. उमरगा याने अवैधरित्या तलवार बाळगली आहे. अशी गोपनीय खबर मिळाल्याने उमरगा पोलीसांनी काल दि. 21.08.2020 रोजी 15.05 वा. सु. त्याला त्याच्या शेतातून तलवारीसह ताब्यात घेण्यात आले. यावरुन उमरगा पो.ठा. चे पोना- दत्तात्रय शिंदे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भारतीय हत्यार कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.