उस्मानाबाद : महेश पाटील 

महाराष्ट्रातील संस्कृती जोपासण्याबरोबरच समाजात एकता निर्माण व्हावी, या संकल्पलनेतून सन १८९४ साली  सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देत बेंबळी ता.जि. उस्मानाबाद येथिल ग्रामस्थांनी प्रथम सन १९१२ साली श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली. त्याकाळी बेंबळी गावातील सुरु केलेले गणेश मंडळ मराठवाड्यातील दुसरा तर महाराष्ट्रातला तिसरा क्रमांकाचेे स्थापन केलेले मंडळ आहे. आज १०८ वर्षाची ही परंपरा कायम आहे.

सन १९१२ साली  बेंबळी गावातील सदाशिव भडंगे, किसनराव मैंदर्ग, नागय्या स्वामी, गुंडोपंत्त कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन गणेश मंडळाची स्थापना केली होती. या मंडळाची अशा आशयाची नोंद औरंगाबाद येथिल विशेष पोलिस महानिरिक्षक कार्यालयात आहे. स्वातंञ्यानंतर ही परंपरा कायम ठेवण्यासाठी 1948 ला अधिकृत न्यास नोंदणी करण्यात आली. कला विकास गणेश मंडळ आजही येथे कार्यरत आहे. मराठवाड्यातील दुसरे क्रमांकाचे मंडळ असल्याने वेगळे महत्व आहे. नंतर परंपरेत खंड पडू नये म्हणून येथे कायमस्वरूपी मूर्ती स्थापन करण्यात आली. पुढे मंदिराचा जीर्णीध्दार होवून सन २०१२ ला मंडळाने मोठ्ये दिमाखात शताब्दी वर्ष समाजोपोगी कार्यक्रमाने साजरा केला.

राज्यस्थान (मकरान) येथून नव्याने आणलेल्या देखण्या गारूच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली महाराष्ट्राच्या जडणघडणीत आज ही १०८ वर्षाची परंपरा तेवत ठेवली आहे. बेंबळीतील गणेश मंडळाची आजही महाराष्ट्रात पावणारा गणपती अशी ओळख आहे.


 
Top