उस्मानाबाद, दि. 17 : जिल्हयात शनिवार दि. 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवानुसार जिल्हयात 200 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 58 जण बरे झाले आहेत.
जिल्हयातील कोरोना बळीची संख्या 122 झाली आहे. जिल्हयात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 422 वर पोहचली आहे. यापैकी 2 हजार 508 जण बरे झाले असून 1 हजार 792 जणांवर उपचार सुरु आहेत.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 78, तुळजापूर 20, उमरगा 21, कळंब 31, परंडा 20, लोहारा 2, भूम 23, वाशी तालुक्यातील 5 जणांचा समोवश आहे.