काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. (22) रोजी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 9 लाखांच्या पंच्चेवीस पंधरा निधीतून येथील गावचे प्रवेशद्वार असलेल्या वार्ड क्रमांक 3 मधील बसस्थानक ते बाजार चौकाकडे जाणाऱ्या सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले‌.   

  

गावचे प्रवेशद्वार असलेल्या या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामासाठी येथील स्थानिक कॉंग्रेसचे कार्यकर्ते माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सुजित हंगरगेकर, करीम बेग आदी कार्यकर्त्यांनी माजी आमदार   तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचेकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यास यश येऊन  पंचवीस पंधरा अंतर्गत सिमेंट कॉंक्रिटीकरण कामासाठी नऊ लाखांचा निधी मंजूर झाला असून शनिवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, बाबुमियॉ काझी, करीम बेग, ग्रा.पं.मकरंद देशमुख, भैरी काळे, विश्र्वास साठे, आयुब सय्यद, भागवत गुंड, दत्ता गाटे, चंद्रकांत काटे, सुहास साळुंके, नजीब काझी, तबारक इनामदार, एहेरार काझी, नागनाथ सोनवणे, माजीद इनामदार, त्रिगुणशील साळुंके, तानाजी हजारे, सुनिल परिट, गोकुळ सोनवणे, सलिम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top