तुळजापूर, दि. 22 : शहरातील श्री सुवर्णेश्वर गणपतीस येथील मगर परिवाराच्यावतीने सुमन मगर यांच्या हस्ते ५१ किलो पंचपक्वानाची आरास करण्यात आली आहे. सदरील पंचपक्वान्न गोरगरीब नागरिकांना वाटणार असल्याचे कुलदीप मगर यांनी बोलताना सांगितले.
यावेळी कुलदीप मगर, पिंटू नाईकवाडी, शिवराज शेटे, योगेश नाईकवाडी, बंडू गव्हाणे, बाळासाहेब सुदर्शन वाघमारे यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.