तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर तिर्थ क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये प्राधिकरण सदस्य या नात्याने १८ जानेवारी २०२० रोजी झालेल्या बैठकीमध्ये नागेश नाईक व विकास मलबा यानी प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी यांना तुळजापूर शहरामध्ये बसस्थानक (जुने) ते क्रांती चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर ते बोंबल्या हनुमान चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमान वेस या रस्त्यावरील पथदिवेचे काम गेली बरेच वर्षे प्रलंबित होते. या रस्त्यावर भाविकांना, नागरिकांना, व्यापाऱ्यांना रात्रीचे ये-जा करण्यास अडचण होत होती, हा विषय 2012 पासून प्रलंबित होता. या अनुषंगाने ऐनवेळेसचा विषय घेऊन याची मागणी केली जिल्हाधिकारी यांनी यास प्रथम प्राधान्याने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

या चारही रस्त्यावरील पथदिव्याचे काम लवकरच सुरु होणार असून दोन रस्त्याचे निविदा प्रक्रिीया पूर्ण झाली असून भवानी रोड व खडकाळ गल्ली मधील कामास टेक्निकल मंजूरी मिळाली आहे व त्याची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन पथदिव्याचे काम पूर्ण होईल.

प्राधिकरण सदस्य यांनी शहरातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याकरिता वेळोवेळी पाठपुरावा केला असून हुतात्मा चौक ते किसन चौकी या रस्त्याचे रुंदीकरणास मोजणीचे काम प्रलंबित होते ते ही काम पूर्ण झाले असून या रस्त्याचे काम प्रलंबित हाते ते ही काम पूर्ण झाले असून या रस्त्याचे मावेजा व नोटीस देण्याचे काम कोरोना संसर्गामुळे प्रलंबित राहिले आहे हे कामही लवकरच मार्गी लागेल. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमानवेस या रस्त्याचे उर्वरित काम ही मोजणी प्रक्रियेमध्ये राहिलेले होते. या कामाबद्दल ही मिटींगमध्ये प्रश्न लावून धरून या कामाकरिता मोजणी करण्याचे आदेश झालेले आहेत. वेळोवेळी प्राधिकरण सदस्य या म्हणून तुळजापूर शहरातील तुळजापूर शहर विकास प्राधिकरणाचे अंतर्गत प्रलंबित कामाचा पाठपुरावा गत दोन मिटींगमध्ये केलेला आहे. यामध्ये तुळजापूर खुर्द रस्ता, तुळजापूर खुर्द येथील धर्मशाळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह रस्त, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय रस्ता या कामाला योग्य ती मुदतवाढ देऊन ही कामे मार्गी लागली आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे सदस्य विकास मलबा कदम, नागेश नाईक यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

 
Top