तुळजापूर : कुमार नाईकवाडी 

महाराष्ट्र राज्य पञकार सुरक्षा समितीची  बैठक शासकीय विश्रामगृह येथे दि. ९ रविवार रोजी महाराष्ट्र राज्य पञकार सुरक्षा समितीचे प्रांत अध्यक्ष यशवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीत सन 2020 ते 2021 या वर्षाकरता पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या.



यामध्ये उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी म्हणून दैनिक जनप्रवासचे पत्रकार सचिन ताकमोघे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष पदी कु. किरण चौधरी यांची फेर निवड करण्यात आली. जिल्हा संघटक म्हणून दिनेश सलगरे यांची निवड करण्यात आली. तसेच नळदुर्ग येथील पत्रकार आयुब शेख यांची तालुकाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी पत्रकार प्रमोद कावरे यांची तर सचिवपदी दैनिक जनमतचे पत्रकार अमीर शेख यांची निवड करण्यात आली. तसेच तुळजापूर शहराध्यक्षपदी युवा दै जनसत्यचे पत्रकार  सिद्धिक पटेल यांची निवड करण्यात आली. यावेळी  सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि नियुक्तीपत्र प्रांत अध्यक्ष यशवंत पवार व मराठवाडा अध्यक्ष शेख यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी शिव निंबाने, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार, रमेश अपराध, भीमा भुईरकर, पत्रकार कुमार नाईकवाडी, अनिल जाधव, अब्बास शेख, विनोद दुपारपुडे उपस्थित होते.

 
Top