तुळजापुर : कुमार नाईकवाडी

संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी गेल्या ४ माहिन्यापासुन सर्व देवस्थाने, प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे अद्याप मंदीरे उघडण्याची परवानगी शासनाने दिली नसल्यामुळे श्रावण मासाच्या तिसऱ्या सोमवारीही तालुक्यातील भगवान शकंराचे महादेव मंदीर बंद असल्याने शिव भक्तांमध्ये नाराजी दिसुन आली. शिव भक्तांनी घराबाहेर न पडता घरातच महादेवाची शिव पुजन करावे असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.

दरवर्षी तुळजापुर शहरासह तालुक्यात श्रावण महिना मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. माञ यावर्षी संसर्गजन्य कोरोनाच्या परस्थितीमुळे सुरु असलेल्या श्रावण माहिन्यात येथील घाटाच्या पायथ्याशी असलेल्या अति प्राचीन मुधग्लेश्वर महादेव मंदीर, श्री बारालिंग रामधरा महादेव मंदीर, श्री तुळजाभवानी मातेच्या दरबातील श्री भवानी शंकर, पापनास तिर्थ येथील निळकंठ महादेव मंदीर, सांगवी मार्डी, तिर्थ (बु) आदीसह महादेव शिव मंदीरे बंद होती. 


सोमवारी पाऊसाची रिमझिम चालु होती. अशातच शिव भक्तांनी श्री महादेव मंदीरात न जाता घरी बसुनच तिसऱ्या सोमवारी शिव शकंराची भक्ती केली. प्रत्येक वर्षी येथील घाटाच्या पायथ्याशी असलेल्या श्री मुधग्लेश्वर महादेव मंदीरात दर सोमवारी शिव भक्तांकडुन दुध, केळी आदीसह फराळाचे साहित्य भक्तांना मोठ्या भक्ती भावाने वाटप केले जाते. शेवटी प्रवचन, भजन, किर्तन, महा अन्नदान सोहळा आदीसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. शहरासह पंचक्रोषीतील शिव भक्त पायी चालत जाऊन वारी करुन श्री महादेवाचे दर्शन घेऊन शिव भोजनाचा आस्वाद घेतात.

यंदा माञ कोरोनाच्या परस्थितीमुळे शासनाच्या वतीने दि. ३१ ऑगष्ट पर्यत लॉकडाऊन केला आहे. यंदा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारीही शिवभक्तांना श्री महादेवाचे दर्शन घेता आले नाही. घरी राहुनच श्री महादेवाचा भक्तीचा जागर करीत श्रावण मास साजरा केला.

 
Top