उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी उमरगा येथील पत्रकार लक्ष्मण पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष मारुती गवळी व प्रदेश संघटक गजानन जोशी, प्रदेश सहसचिव अनंत साखरे यांच्या प्रस्तावानुसार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर गायकवाड यांनी लक्ष्मण पवार यांची उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. सदरील नियुक्तीचे पत्र पवार यांना देण्यात आले आहे. पवार यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
