उस्मानाबाद, दि. 1 : जिल्हयात मंगळवार दि. 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवानुसार आज जिल्हयात 168 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 36 रुग्ण बरे होवून घरी गेले आहत.
जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 850 वर पोहचली आहे. यापैकी 3 हजार 697 जण बरे झाले असून 1 हजार 999 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 154 जणांचा बळी गेला आहे.





