उमरगा, दि. 1 : मुरुम येथील दैनिक सकाळचे पत्रकार शफी इमामसाब इमडे वय ४१ यांचे अपघाती निधन झाले आहे. ते वैयक्तिक कामानिमित्त लोहारा येथे आपल्या दुचाकीवर जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली असा परिवार आहे. गेल्या वीस वर्षांपासून दैनिक सकाळ मुरूमचे बातमीदार म्हणून काम करत होते. त्यांच्या अचानक जाण्याने मुरूम गावावर शोककळा पसरली आहे.
