उस्मानाबाद, दि. 26 : उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 237 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 350 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 454 झाली आहे. यातील 8 हजार 772 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 341 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 341 जणांवर उपचार सुरु आहे.







