नळदुर्ग, दि. 26 : बायकोचे पहिले लग्न झाल्याचे सासरच्यानी लपवुन फसवणुक केल्याने या घटनेतून नैराश्य आलेल्या एका 27 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अणदुर ता. तुळजापूर शिवारातील गोलाईत घडली आहे. याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुध्द नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, हरी लक्ष्मण साळुंके, वय 27 वर्षे, रा. अणदुर, ता. तुळजापूर यांनी दि. 23 ते 24 सप्टेंबर या कालावधीत गाव शिवारातील गोलाई पणन येथील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नीचा यापुर्वीच पहिला विवाह झाला होता. ही हकीकत सासु- सासरे व अन्य चौघे व्यक्ती यांनी हरी साळुंके यांच्यापासुन लपवून ठेवली होती. याच फसवणुकीमुळे हरी याने नैराश्याच्या भरात आत्महत्या केली असून यामुळे त्याच्या आत्महत्येस सासरकडील 6 लोक जबाबदार आहेत, अशी तक्रार अंबिका वाघमोडे (मयताची बहिण) यांनी दि. 25.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने हे करीत आहेत.
