नळदुर्ग, दि. 27 : शहापूर ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'शाळा बंद शिक्षण चालू' या उपक्रमांतर्गत इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत. सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे. मात्र अनेक मुलांच्या पालकाकडे मोबाईल नाहीत. त्यामुळे अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद शहापूर शाळेतील शिक्षक विक्रम मगतराव यांनी इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थ्याना स्वखर्चाने स्वाध्याय पुस्तिका वाटप केले. यासाठी विस्ताराधिकारी (शिक्षण) शोभा राऊत, केंद्रप्रमुख बळवंत सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे शिक्षक मगतराव यांनी सांगितले.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश नवाडे, उमा गोरे, भरत मोरे, शंकर मोरे, तानाजी काळे, अरविंद जगताप आदीजण उपस्थित होते.


 
Top