उस्मानाबाद, दि. 13 : उस्मानाबाद जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून आज रविवार दि. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 249 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 113 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 8 हजार 541 झाली आहे. यातील 6 हजार 3 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत  246 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 292 जणांवर उपचार सुरु आहे.










 
Top