तुळजापूर, दि. 07 : अमीर ईब्राहीम शेख, रा. अपसिंगा, ता. तुळजापूर यांच्या जाधव कॉम्प्लेक्स, तुळजापूर येथील दुकानाचे व शेजारील दुकानावरील बाजूचा पत्रा अज्ञात चोरट्याने दि. 06.09.2020 रोजी मध्यरात्री कापून दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम 47,000/-रु. व सी.सी.टी.व्ही. सह हार्ड डिस्क चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या अमीर शेख यांनी दि. 07.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.