उमरगा : युवराज निळकंठ चव्हाण- आडे, रा. तळणी तांडा, ता. औसा यांनी दि. 18.08.2020 रोजी 16.30 वा. सु. हनुमानगर झोपडपट्टी, उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर मो.सा. क्र. एम.एच. 14 एचझेड 1269 ही निष्काळजीपणे चालवल्याने घसरली. या अपघातात युवराज चव्हाण- आडे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या निळकंठ सिद्राम चव्हाण- आडे (मयताचे वडील) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top