नळदुर्ग, दि. 8 : शहरात होत असलेल्या महामार्गावरील दुभाजकामध्ये पथदिवे बसविणे, हाइमास्ट लैंप, रिफ्लेक्टर साईन बोर्ड, आवश्यक तेथे गतिरोधक व रंबलर स्ट्रीप करणे, सर्विसरोड व महामार्गावरिल सोडण्यात आलेल्या खुल्या जागेत बगीचा, वृक्षारोपण व हिरवळ निर्माण करावेत, या प्रमुख मागण्यासाठी आज नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग तूळजापुर-अक्कलकोट, सोलापुर विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावरुन उतरुन मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. सदरील निवेदन कार्यकारी अभियंता यांच्याकडून महेंद्र सिंग यांनी स्विकारले. या निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सुरज चव्हाण, सचिव भाऊराज कांबळे, उपाध्यक्ष निखील येडगे आदींच्या स्वक्ष-या आहेत.