चिवरी : राजगुरु साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील नागरिकांची रक्तदाब तपासणे, शुगर तपासणी, ऑक्सीजन तपासणी, आधी तपासण्या करण्यात आल्या.
कोरोना सारख्या महाभयंकर रोगामुळे ग्रामीण भागातील जनतेला बाहेरगावी जाता येत नाही. त्या अनुषंगाने सदरील शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबीरात डॉ. स्वामी, डॉ. डांगे यांचे सहकार्य लाभले. शिबीर यशस्वी करण्यासाठी आशा कार्यकर्त्या, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील आदींनी पुढाकार घेतला.