बेंबळी, दि. 03 : जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन बेंबळी पो.ठा. च्या पोलीसांनी आज दि. 03.09.2020 रोजी 03.10 वा. मौजे समुद्रवाणी फाटा येथील सागर ढाब्याजवळ छापा मारला. यावेळी 1)राम गडदे 2)संजय सोलनकर, दोघे रा. दाउतपुर, ता. उस्मानाबाद 3)जग्गु पवार 4)बजरंग पवार 5)अनिल पवार, तीघे रा. पारधी पिढी, तेर 6)अजिंक्य थोरात, रा. बार्शी हे सर्वजण तिरट जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 23,150/-रु. बाळगले असतांना पोलीसांना आढळले. यावरुन नमूद 6 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
