उस्मानाबाद, दि. 03 : कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 02.09.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 239 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 52,500 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.
