मनोज डोलारे

उस्मानाबाद : महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच जिल्हा कार्यकारिणी जाहीर  करण्यात आली असून जिल्हा सचिव पदी प्रा. मनोज भारतराव डोलारे, जिल्हा खजिनदार पदी गणेश महादेव एडके तर जिल्हा उपाध्यक्ष पदी सुनील जनार्धन बुट्टे, प्रशांत शहाजी अडसुळे, सतीश अर्जुनराव घुले व जिल्हा सहसचिव पदी किरण दत्तात्रय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. 

त्यांच्या निवडीचे पत्र संघटनेचे सचिव डॉ. जे. पी. बघेल यांनी प्रदान केले आहेत. 

 संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी तसेच जिल्हाभरात संघटनेचा विस्तार वाढवण्यासाठी यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीबद्दल  सर्वांचेच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 तर ह्या सर्वांच्या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष प्रा. सोमनाथ लांडगे व अनेकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top