तुळजापूर : कुमार नाईकवाडी
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र चालू करावे, याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या मीडिया सेलच्यावतीने बुधवार दि. 30 सप्टेंबर उस्मानाबाद याना तुळजापूर नायब तहसीलदार शिंदे यांच्यामार्फत देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, तहसील कार्यालय आवारातील सेतू सुविधा केंद्र गेल्या 7 महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे बाहेर चालु असलेले महा ई सेवा केंद्रामध्ये भरमसाठ पैसे घेवून सर्वसामान्यांची लुटमार होत आहे. कारण सेतु सुविधा केंद्रामध्ये 33 रु होणारे काम बाहेरील ई सेवा केंद्रमध्ये 100 ते 150 रुपये नागरीकांना मोजावे लागत आहेत. यामुळे शेतकरी विद्यार्थी व नागरीकांना नाहक त्रास होत आहे. मार्च 2020 पुर्वी सेतु सुविधा केंद्रात विविध प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या संचिका नागरीकांना अद्याप पर्यंत प्रमाणपत्र मिळाले नाहीत. वारंवार पोचपावती दाखवुन सुध्दा संबधित कर्मचारी टाळाटाळीचे उत्तर देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातुन येणा-या नागरीकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. त्याना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी जिल्हाधिकारी यांनी सदरील बाबीकडे लक्ष देवुन जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र त्वरित सुरु करावे, अन्यथा भारतीय जनता पार्टी मिडीया विभागाच्यावतीने याबाबत तीव्र अंदोलन करण्यात येईल. आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्या सर्वस्वीं जबाबदारी प्रशासनावर राहिल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर जिल्हाउपाध्यक्ष संजय खुरुद, तालुकाध्यक्ष सचिन ताकमोघे, शहराध्यक्ष सागर कदम, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ शेटे यांच्या साक्ष-या आहेत.
