![]() |
| संग्रहित छायाचित्र |
तुळजापुर : कुमार नाईकवाडी
मराठवाड्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार व त्यांच्या पत्नी सौ. कुंतीताई पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मंगळवार दि. २९ रोजी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेस पंचामृत अभिषेक यथा सांग पुजा करण्यात आली. यावेळी येथील श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी तथा रा.काँ. युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांनी श्री तुळजाभवानी मंदीर महाद्वार येथे महाआरती करुन पवार दांपत्यांना निरोगी व दिर्घायु देवो अशी श्री देवी चरणी प्रार्थना केली.

