उस्मानाबाद, दि. 16 : दापका ता. उमरगा येथील बिभीषण विठ्ठल गायकवाड वय 65 वर्षे यांचे मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त उमाकांत गायकवाड व भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांचे वडील होत. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.