तुळजापुर : कुमार नाईकवाडी
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्य व केंद्र सरकारचा निषेध करीत "आरक्षण आमच्या हक्काच" नाही कुणाच्या बापाचं" असा जय घोष करीत राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात बुधवार दि. १६ रोजी तुळजापुर तहसील कार्यालसमोर घोषणाबाजी करुन बोंबमारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला केंद्र व राज्य शासन जवाबदार असून व्यवस्थित पाठपुरावा न केल्यामुळे मराठा समाज बांधवाच्या आरक्षण धक्का लागला. महाराष्ट्रात मराठा समाज बांधवानी शांततेने ५८ मोर्चे काढले. ४२ मराठा बांधवानी आरक्षणासाठी बलीदान दिले. त्यामुळे या पुढे मराठा समाज बांधव गप्प बसणार नाही. येत्या ८ ते १० दिवसात केंद्रातील मराठा खासदारानी व राज्यातील मराठा आमदारानी आरक्षणा संदर्भात व्यवस्थित पाठ पुरावा करुन आरक्षण बाबतीत योग्य निर्णय घेण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावा, अन्यथा या पुढे मराठा क्रांती ठोक मोर्चा आपणास रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने देण्यात आला.
यावेळी सज्जनराव सांळुके, सचिन रोचकरी, महेश गवळी, जिवन राजे इंगळे, धैर्यशील कापसे, अर्जुन सांळुके, कुमार टोले, आण्णासाहेब क्षिरसागर, सागर इंगळे, प्रतिक रोचकरी, जनहित संघटनेचे अजय सांळुके, प्रशांत सोंजी, राहुल खपले, मयुर कदम, राजाभाऊ चोपदार, पप्पु इंगळे, विश्वास मगर, दुबेर शेख, दिपक पोहेकर, सचिन टोले, खंडु टोले आदीसह ४० ते ५० मराठा बांधव उपस्थित होते. या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बोंब मारो आंदोलन दरम्यान आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या रोडवर तुळजापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी कडक बंदोबस्त लावला होता.

