तुळजापुर : कुमार नाईकवाडी
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ तुळजापुर तालुका शिवसेनेच्या वतीने बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी तुळजापूर तहसीलदार यांना एक लेखी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, काही दिवसापुर्वी केंद्र सरकारकडून कांदा दर नियंत्रणमुक्त केले व कांदा अत्यावश्यक वस्तुच्या कायद्यातुन काढले असे असताना ही केंद्रातील भाजपा सरकारने कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय दिला असा ढोल वाजविला गेला होता आणि आता वेळ येताच दलालांना पैसे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी विरोधी हा तुघलकी निर्णय घेतला. शेतक-या प्रति असलेले बेगडी प्रेम दाखवून अजून किती दिवस शेतक-यांचा बळी घेणार आहात. त्यामुळे शेतकर्याचे कंबरडेच मोडणार आहे. निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा शिवसेना स्टाईल मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख शामराव पवार, तालुकाध्यक्ष जगनाथ गवळी, शहरप्रमुख सुधीर कदम, उपतालुका प्रमुख सुनील जाधव, कृ,उ.बा. उपसभापती संजय भोसले, उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापुसाहेब नाईकवाडी, दिनेश रसाळ, अनिल भोपळे, महेंद्र सुरवसे, बालाजी पांचाळ आदीसह शिवसैनिकाच्या स्वाक्षरी आहेत.

