पुणे, दि. 16 : समिधा नारीशक्ती संघटना व We Can lead फाऊंडेशनने नाविन्यपूर्ण संकल्पनेतून सामाजिक भान जपत ग्रामीण महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी राधिका पापड लघुउदयोग सुरू  करून महिलांना रोजगार निर्मितीची सुवर्ण संधी उपल्बध करून दिली आहे. समिधा नारीशक्ती व We Can lead फाऊंडेशनचे हे कार्य उल्लेखनीय असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

समिधा नारीशक्ती संघटना व we can lead फाऊंडेशनच्या नूतन राधिका पापड या वाणाचे शुभारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सुनंदा पवार यांनी या विशेष उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

महिलांना गावात रोजगार निर्मिती करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम हाती घेत घेतले आहे. सध्या कोरोना संसर्गजन्य आजारामुळे व्यवसाय सर्व ठप्प झाले. तसेच महिला व युवतींना रोजगार नसल्याने शहरातून अनेक ग्रामस्थ गावाच्या दिशेने स्थलांतर झालेत. त्यामुळे महिलांना जोडव्यवसाय सुरू करण्याचा मानस होता. तसेच समिधा नारीशक्ती संघटना व we can lead फाऊंडेशनचा महिला सक्षमीकरण बचतगट समूहाला मार्गदर्शन व विविध व्यवसायाकडे वाटचालीसाठी वेळोवेळी या कार्यात सातत्य ठेवत आहे. तसेच पुढील नवनवीन वाणाचे लवकरच उत्पादने चक्की, शेंगदाने चटणी, यासह अनेक नूतन व्यवसाय सुरू करण्याकडे आमचा प्रयत्न सुरू आहे. महिलांना चूल आणि मुल न करता उदयोजक करण्याचा आमचा मानस असल्याचे समिधा नारीशक्ती संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दिव्या यशवंत भोसले यांनी बोलताना सांगितले. 

तसेच यासाठी जळगाव अध्यक्ष करिष्मा भोसले, we can lead अध्यक्ष सर्वेश मुंढे, युगविनी देशमुख योगेश चौधरी, डॉ. नचिकेत पाटील, धनंजय पाटील आदी याकार्यात परिश्रम घेत आहेत. सध्या पुणे येथे हा व्यवसाय सुरू झाला असून तो संपूर्ण महाराष्ट्रात राबविणा-याची मोहीम हाती घेणार आहोत, असे यावेळी दिव्या भोसले बोलताना म्हणाल्या.

 
Top