उमरगा, दि. 22 : माधव पवार यांची भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली. ज्ञानदीप विद्यालय दाळींब येथील वर्गमीत्रानी परवाच १९९० साली इयत्ता दहावी झालेल्या काही मित्रानी एक व्हाटसप ग्रुप तयार केला होता. त्या माध्यमातून माधव पवार ची निवड झालेली बातमी कळली व चार पाच मित्रानी मिळुन आपल्या वर्गमित्राच कौतुक करायच ठरवलं व त्यानी तशी तयारी केली. चार दिवस प्रयत्न करुन त्यानी ब-याच मित्राना संपर्क केला. हे सर्व मित्र ३० वर्षानी एकत्र आली. आपल्या वर्ग मित्राचा सत्कार राजेंद्र हुंजे यांच्या उपस्थितीत दाळींब येथे संपन्न झाला.
बरेच जण गेली तीस वर्ष एकमेकांना कधीच भेटले नव्हते. पण या सत्काराच्या निमित्ताने जवळपास ४० मित्र एकत्र आले व सर्व बालमित्रानी मिळुन आगळा वेगळा कौतुक सोहळा साजरा केला. यासाठी माधव पवार यांचे काही मित्र मुंबई, पुणे, सोलापुर, लातूर, कोराळ, लोहारा, सुंदरवाडी आदी ठिकाणाहून आले होते. या सत्काराची चर्चा परीसरात एक चर्चेचा विषय ठरला आहे.
यासाठी विजय पाटील, शाहुराज माने, शफीक शेख, उस्मान कमाल, बब्रुवान सुरवसे, विनोद जाधव यानी प्रयत्न केले. यावेळी रत्नदीप मिटकरी, दयानंद कांबळे, अरुण भगत, किशोर सुरवसे, विलास माने, बालाजी शिंदे, विष्णु कांबळे, संतोष भगत, राजेंद्र सुरवसे, नामदेव सांगवे, राजाराम सुरवसे, सुभाष जंगाले, रत्नाकर चव्हाण, संभाजी जाधव, वसंत राठोड, वैराज कुलकर्णी, शाम शिंदे, नयुम कारभारी, आयुब औटी, संजय जाधव, शिवाजी टिकांबरे, मुबारक शेख, संजय जाधव आदी वर्गमित्र उपस्थित होते.
