उमरगा, दि 22 : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन उमरगा भाजपा शिष्टमंडळाने तहसीलदार संजय पवार यांना दिले आहे.
उमरगा तालुक्यात काही दिवसांत पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. त्यामुळे शेती शिवर जलमय झाल्याने हातातोंडाशी आलेल्या घास पाण्यात गेला. महसूल विभागातील पाचही मंडळातील सोयाबीन, उडीद, ऊस व तुर पिकांचे नुकसान झाले असून त्वरीत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणाची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी शिष्टमंडळाने पाऊस वादळात तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, युवा मोर्चा ता.अध्यक्ष माधव सलके, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अमर सलके, युवा मोर्चा सरचिटणीस पंकज मोरे, साधू करके, राहुल आष्टे आदी उपस्थित होते.
