नळदुर्ग, दि. 22 : राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नळदुर्ग शहराध्यक्ष महेबुब शेख यांची निवड करण्यात आली आहे. सदरील निवडीचे पत्र आज मंगळवार दि. 22 रोजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या हस्ते उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी भवनात झालेल्या एका कार्यक्रमात देण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, युवती प्रदेशाध्यक्षा कु. सक्षणा सलगर जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, गोकुळ शिंदे, मकसूद शेख, उस्मानाबाद शहराध्यक्ष अयाज शेख, नगरसेवक मुश्ताक कुरेशी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महेबुब शेख यांची नळदुर्ग शहराध्यक्षपदी निवड झाल्याचे समजताच स्वच्छता, आरोग्य व दिवाबत्ती सभापती सौ. भारती बनसोडे, नगरसेवक उदय जगदाळे, शहबाज काझी, उदयोन्मुख उद्योगपती मनीष हजारे, पत्रकार सुनील बनसोडे, माजी नगरसेवक नवाज काझी, युवासेनेचे ज्ञानेश्वर घोडके, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्ते, पदाधिका-यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
