उस्मानाबाद, दि. 22 : उस्मानाबाद जिल्हयात आज मंगळवार दि. 21 सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 206 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 254 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 10 हजार 592 झाली आहे. यातील 7 हजार 579 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 318 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 695 जणांवर उपचार सुरु आहे.
