नळदुर्ग, दि. 22 :  थोर समाजवादी नेते पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या जीवनावर आरोग्य सेना व स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने माहितीपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या महितीपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक धनंजय भावलेकर हे करणार आहेत. 

 पन्नालाल सुराणा हे समाजवादी चळवळीचा देशातील चालता बोलता दस्तऐवज आहेत. पूर्वीचा समाजवादी पक्ष, राष्ट्र सेवा दल, जनता पक्ष, समाजवादी जनपरिषद, सध्याची सोशलिस्ट पार्टी (इंडिया), अनेक पुरोगामी संघटना आणि असंख्य जन आंदोलने यांच्या उभारणीत त्यांचे अमूल्य योगदान आहे. दैनिक मराठवाडाचे संपादक म्हणून त्यांची कारकीर्दही गाजली. आणीबाणीतील वेषांतर आणि भूमिगत लढा यामुळे त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला एक क्रांतिकारकाचे परिमाण लाभले. आजही वयाच्या नव्वदीच्या जवळ जात असतानाही देशातील परिस्थिती बदलण्याचा त्यांचा दुर्दैम्य आशावाद आणि त्यासाठी पायपीट करण्याचा उत्साह थक्क करून टाकणारा आहे. अशा पन्नालालजींचे आयुष्य चित्रफीतबद्ध होणे या देशातील पुढच्या पीढीसाठी  गरजेचे वाटते.  

दिग्दर्शक धनंजय भावलेकर यांनी अनेक लघुपट, माहितीपट केलेले असून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. भाई वैद्य यांच्या जीवनावरील महितीपट आणि ‘कर्मवीर’ हा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील चित्रपट हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. 

या महितीपटास एकूण बारा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. कोरोना महामारीमुळे चित्रीकरणावर अनेक मर्यादा येणार आहेत, खर्चही अधिक येण्याची शक्यता आहे.  

पन्नालाल सुराणा यांच्यावर प्रेम करणार्‍या सर्वांना या माहिती पटासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे  आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकानी देणग्या पुढील खात्यावर  जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य सेना 

सेव्हिंग्ज खाते क्र: ०७९१०१००००६५८३

बँक ऑफ बडोदा, सुभाषनगर, पुणे

आय एफ एस सी कोड  BARB0SUBHAS  

(5th character is Zero and not O)


किंवा 

आपला धनादेश ‘आरोग्य सेना’ नावाने काढून आरोग्य सेना , राष्ट्रीय मुख्यालय, सणस प्लाझा, बाजीराव रोड, पुणे ४११००२ या पत्त्यावर पाठवू शकता. 

किंवा आरोग्य सेना राष्ट्रीय मुख्यालय फोन ९०११०५९०६० यांच्याशी संपर्क साधल्यास पुण्यातील देणगी धनादेश नेण्याची सोय कार्यालय करेल. 

या देणग्यांना ८० जी अंतर्गत आयकर सवलत आहे.


 
Top