तामलवाडी : उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने नागरीकांनी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत ब्रिक्स मानवाधिकार तथा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी तुळजापुर लाईव्हशी बोलताना व्यक्त केले आहे.
संपूर्ण देशासह राज्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असुन लाखो लोक या कोरोनाच्या विळखायात सापडले असुन हजारो नागरीकाचे बळी जात आहेत.या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव शहरी भागासह ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.देशामध्ये अनलॉक ४ चालु आहे. परंतु अनलॉक करताना प्रशासनाने अनेक नियम घालुन दिले असतानाही प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
नियमांचे उल्लंघन करून जणु कोरोना परत गेला असल्यासारखे नागरीक वावरत आहेत.अनेकजण विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. तर दोनचाकी गाडीवर तीन ते चारजण विनामास्क प्रवास करताना दिसत आहेत.दुकानासमोर अनेकजण सामाजिक अंतर न राखता एकमेकांना खेटुन माल खरेदी करत आहेत अशा वेळी दुकानदाराने ग्राहकांना सामाजिक अंतर राखुन मास्क वापरण्याच्या सुचना देण्याची गरज आहे.एखाद्या ठिकाणी मित्र एकत्र आल्यानंतर हे तर माझे मित्र आहेत असे म्हणुन किंवा आपल्या घरामध्ये एखादे कार्य असल्यास हे माझे नातेवाईक आहेत इथे मास्क वापरण्याची काय गरज असे म्हणून आपण कोरोनाला आमंत्रण तर देत नाही ना? याची खात्री करून आपण अनेकजण एकत्र आल्यावर मास्कचा नेहमी वापर करा.सध्या अनेक रूगणालयामध्ये रूग्णांची अर्थिक लुट होत आहे तसेच काही ठिकाणी ऑक्सीजनचा पुरवठा होत नसल्याने मृत्युच्या प्रमाणही वाढताना दिसत आहे.
तसेच अनेक मोठी गावे कोरोनाच्या विळख्यात सापडली असुन पाच पाच दिवस गाव बंद करून जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. याचे भान ठेऊन तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करून प्रतेकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतल्यास कोरोना नक्कीच आपल्या गावापासुन कोसो दुर जाईल परंतु असे होताना दिसत नाही .शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येक नागरीकांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व बाहेर पडताना मास्कचा नेहमी वापर करा करावा,हात साबणाने स्वच्छ धुवावेत,आपल्या परीसरात स्वच्छता ठेवावी अशी पध्दतीची खबरदारी नागरीकांनी घेण्याची सध्या गरज असतानाही सर्रास प्रशासनाचे नियमांचे उल्लंघन होताना दिसत असुन नागरीकांनी नियमांचे पालन करून खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचे मत शिवरत्न बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेड व ब्रिक्स मानवाधिकार मिशनचे तालुकाध्यक्ष सर्जेराव गायकवाड यानी तुळजापुर लाईवशी बोलताना व्यक्त केले आहे.
