![]() |
| प्रतिकात्मक |
नळदुर्ग, दि. 30 : येथील अक्कलकोट रोडलगत असलेल्या शॉपींग कॉम्पलेक्समध्ये संगणकावर जुगार खेळत असताना पोलीसांनी अचानक छापा मारुन सुमारे साडे हजार रुपये रोख रक्कम जप्त केले. या कारवाईत सात जणांविरुध्द मुंबई जुगार कायदयांतर्गत नळदुर्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, 1) सागर हजारे 2) संजय भोगे 3) ख्वॉजा शेख 4) मोबीन शेख 5) मजर शेख 6) ताहेर शेख 7) मुशाहिद मोमीन, सर्व रा. नहदुर्ग हे दि. 30.09.2020 रोजी नळदुर्ग शहरातील अक्कलकोट रस्त्यालगत असणाऱ्या जगदंबादेवी शॉपींग सेंटर मधील गाळा क्र.1 मध्ये संगणकावर जुगार खेळत असतांना साहित्य व रोख रक्कम 6,480/-रु. बाळगले असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.
दरम्यान, नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी संगणकावर जुगाराचा बेकायदेशीर धंदा जोमात सुरु आहे. यापूर्वी या जुगा-याच्या आहारी जावून अनेकजण कर्जबाजारी झाले. तर वस्तू गहाण ठेवल्या. अनेक कुटूंब जुगारामुळे उध्दवस्त होण्याच्या मार्गावर असून जिल्हा पोलीस अधिक्षकांनी विशेष बाब म्हणून नळदुर्ग व परिसरात जुगारासह इतर अवैध धंदे बंद करण्याची मागणी नागरिकांतुन होत आहे.
