शिराढोण, दि. 08 : दि. 05.09.2020 रोजी 17.30 वा. सु. कळंब तालुक्यातील निपाणी गावातील सचिन शाहु गुंड यांनी आपली मोटारसायाकल स्वत:च्या घरासमोरील रस्त्यावर लावली होती. या मोटारसायकलमुळे रहदारीस अडथळा होत असल्याने त्यांचा भाऊ- सुनिल शाहु गुंड याने सचिन गुंड यांना मोटारसायकल लावल्या ठिकाणाहुन काढण्यास सांगीतली. यावरील वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही भावांच्या कुटूंबातील स्त्री- पुरुष सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, लोखंडी गजाने मारहाण केल्याने दोन्ही गटातील सदस्य जखमी झाले.

    अशा मजकुराच्या दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन दि. 08.09.2020 रोजी स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 
Top