कळंब, दि. 08 : बालकांच्या पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून कळंब येथील 1)आरेफ मिर्झा 2) आमीर मिर्झा 3) अमा्रन मिर्झा 4)तय्यब मिर्झा 5)शाहीद शेख 6)सिध्दार्थ बिडबाग 7)आसद सय्यद 8)अल्ताफ शेख 9)हरीओम गोरे 10)वसीम सय्यद 11)उस्मान मिर्झा यांसह अन्य 6 लोकांनी दि. 06.09.2020 रोजी 21.30 वा. सु. कळंब येथील तांदुळवाडी रस्त्यालगत असलेल्या शुभमंगल कार्यालयासमोर  भिमनगर, कळंब येथील सम्राट मच्छिंद्र गायकवाड व किसन मचाले या दोघांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच दगड, बिअरची बाटली, काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. यात सम्राट गायकवाड यांच्या चेहऱ्यास, डोक्यास गंभीर जखम झाली तर किसन मचाले यांच्या नाकाचे हाड मोडले. अशा मजकुराच्या सम्राट गायकवाड यांनी दि. 07.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 147, 148, 149, 326, 336, 337, 338, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top