उमरगा, दि. 8 : कार क्र. एम.एच. 24 व्ही 4021 च्या अज्ञात चालकाने दि. 30.08.2020 रोजी 19.30 वा. सु. उमरगा येथील उमरगा चौरस्ता- गुलबर्गा रस्त्यावरील पुलाजवळ नमूद कार निष्काळजीपणे चालवून मो.सा. क्र. एएडी- 4575 वरुन जात असलेल्या माधव पांडुरंग गायकवाड, रा. औराद, ता. उमरगा यांना समोरुन धडक दिली. या अपघातात माधव गायकवाड हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमीस उपचारकामी न नेता, पोलीसांना खबर न देता संबंधीत कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. अशा मजकुराच्या माधव गायकवाड यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ)(ब) अन्वये दि. 07.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.